आशाचा संपाचा ग्रामीण भागात आरोग्ययंत्रणेवर परिणाम

दरमहा किमान वेतन, ऑनलाईन कामाची सक्ती नको, दिवाळी व भाऊबीज भेटीसाठी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आशा, गटप्रवर्तक यांनी बुधवारपासून पुकारलेला बेमुदत कामबंद संप सलग सहाव्या दिवशी सुरूच होता.  या संपाचा परिणाम ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेच्या मोहिमांवर जाणवू लागला आहे.
गेली अनेक वर्षे आशा व गटप्रवर्तक महिला आपल्या विविध मागण्यांसाठी वारंवार आंदोलन करत आहेत. पुन्हा एकदा मागण्यांसाठी एल्गार केला आहे. १७ ऑक्टोबरला जिल्हा परिषदेवर मोर्चा काढत १८ ऑक्टोबरपासून बेमुदत कामबंद संप करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार हा संप सुरू झाला आहे. सोमवारी यावर तोडगा न निघाल्यामुळे सलग सहा दिवस हा संप सुरूच आहे. याचा परिणाम ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवर जाणवू लागला आहे.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button