सुप्रिया लाईफलाईन्स आणि केआयआयटी ओरल कॅन्सर डिटेक्शन कीट विकसित करणार
लोटे औद्योगिक वसाहतीतील सुप्रिया लाईफलाईन्सने कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजी (केआयआयटी),भुवनेश्वर यांच्यासोबत क्विकब्लू ओरल कीट नावाचे तोंडाचा कर्करोग शोधण्याचे कीट विकसित करणार आहे. हे कीट अखंडपणे तोंडाचा कर्करोग शोधते आणि संभाव्य प्रीक्लिनिकल आणि क्लिनिकल चाचण्यांची गरज कमी करू शकते. कंपनीने क्विकब्लू ओरल कीटच्या पेटंटसाठीही अर्ज दाखल केला आहे.
सुप्रिया लाईफलाईन्सचे अध्यक्ष डॉ. सतीश वाघ यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, क्विकब्लू ओरल कीट तोंडाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी महत्वपूर्ण ठरले. ज्यामुळे तोडाच्या अल्सर बरे होत नसलेल्या प्रकरणांमध्ये एकाधिक बायोप्सीची गरज नाही. तोंडाच्या कॅन्सरचे लवकर निदान झाल्यास त्यावर उपचार करून रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
www.konkantoday.com