श्री देव धुतपापेश्वर मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम स्थानिकांना विश्वासात घेऊनच मार्गी लावण्याचे निर्देश
समस्त राजापूरवासीयांचे आराद्य दैवत असलेल्या धोपेश्वर येथील श्री देव धुतपापेश्वर मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम स्थानिकांना विश्वासात घेऊनच मार्गी लावण्याचे निर्देश राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी प्रशासनाला दिले.
पुरातन आणि ऐतिहासिक वारसा आणि ठेवा असलेल्या या मंदिर जिर्णोध्दाराचे काम हे शासनाच्या वतीने रत्नागिरी जिल्हयात होत असलेले हे पहिलेच काम आहे. त्यामुळे ते दर्जेदार तर झाले पाहिजेच पण ऐतिहासिक वारसा जपून झाले पाहिजे, त्यामुळे स्थानिकांच्या सुचनांचा आदर करून, त्यांना विश्वासात घेऊनच हे काम मार्गी करावे अशा सक्त सूचना ना. सामंत यांनी एमएमआरडीचे अधिकारी, स्थानिक प्रशासन व संबधीत ठेकेदार कंपनीला दिल्या.
शासनाकडून राज्यातील पुरातन व प्रमुख मंदिरे जनत व संरक्षित करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्हयातील राजापुरातील श्री देव धुतपापेश्वर मंदिराचा समावेश आहे. यासाठी सुमारे ११ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
www.konkantoday.com