रक्ताचं नातं सांगणाऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचाराचा गळा घोटला-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिवसेनेच्या दोन्ही गटांचा आज दसरा मेळावा पार पडला. शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौफेर टोलेबाजी केली
भगवी लाट मला इथं पहायला मिळत आहे. आम्ही सत्तेला लाथ मारली पण बाळासाहेबांचा विचार खाली पडू दिला नाही. बाळासाहेबांचे विचार आमच्यासाठी शिवतीर्थ आहे. तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही मुठमाती दिली. खंजीर खुपसण्याचं काम तुम्ही केलंय. हे हमासची गळाभेट देखील घेतील. किती लाचारी करणार? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
रक्ताचं नातं सांगणाऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचाराचा गळा घोटला. यांनी निर्लज्यपणाचे कळस गाठले. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आम्हाला दिल्यानंतर यांनी शिवसेनेच्या खात्यातील पैसे 50 कोटी मागितले. माझ्यापेक्षा जास्त यांना कोण ओळखतं का? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे. यांना खोके नाही तर कंटेनर पाहिजे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
www.konkantoday.com