यंदा संजय राऊत यांच्या उपस्थितीने ती खुर्ची चैतन्यमय दिसणार -शिवसेना नेत्या सुषमा अंधारें


उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा परंपरेप्रमाणे शिवाजी पार्कवर होईल तर शिंदे गटाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे.आजच्या दसरा मेळाव्याची चर्चा राज्यभरात सुरू आहे.दोन्ही नेते व्यासपीठावरून काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. गेल्या वर्षीच्या दसरा मेळाव्यात संजय राऊतांची खुर्ची रिकामी होती यावरून शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंनी वक्तव्य केले आहे. गेल्यावर्षी एक खुर्ची रिकामी संजय राऊतांची एक खुर्ची रिकामी होती. मात्र यंदा संजय राऊत यांच्या उपस्थितीने ती खुर्ची चैतन्यमय दिसणार आहे, असं मत अंधारे यांनी व्यक्त केलंय

सुषमा अंधारेंनी या वेळी एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यावर देखील टीका केली आहे. मुंबईमध्ये दसरा मेळावा हा एकच असतो बाकी ‘ इव्हेंट’ चे आम्हाला माहिती नाही. आम्ही महाराष्ट्रात गाड्या पाठवल्या नाहीत. उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी संपूर्ण राज्यातून शिवसैनिक कष्टाची भाकरी घेऊन शिवतीर्थावर पोहचत आहेत अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button