
पेढे परशुराम चौपदरीकरण, मोबदला प्रश्नी मंत्रालयात झाली बैठक
चिपळूण ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील पेढे परशुराम येथील संपादीत झालेल्या जमिनीचा मोबदला १०-१० प्रमाणे अनुक्रमे कूळ व देवस्थानला देण्याचा निर्णय घेण्यात आला. याचवेळी वहीवाटदार, खोत व देवस्थानसाठी अनुक्रमे ८०- १०-१० असा निर्णयही घेण्यात आला. याबाबतचे राज्य शासन तात्काळ न्यायालयाकडे प्रतिज्ञापत्र सादर करणार असून मोबदला वाटपाची संमत्ती न्यायालयाकडून घेतली जाणार आहे. सदर न्यायालयीन प्रक्रिया चार महिन्यात पूर्ण होईल. तोपर्यंत येथील कोणत्याही बांधकामाला हात न लावण्याचे आदेशही संबंधित अधिकार्यांना देण्यात येतील, अशी ग्वाही महसूलमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी दिली.