निलेश राणेंच्या राजीनाम्याने सिंधुदुर्गात समर्थक राजीनाम्याच्या तयारीत!


, भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा कुडाळ – मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी मंगळवारी (दि.२४) दस-याच्या मुहुर्तावर मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही असे आपल्या ट्विटरवरून जाहीर केले. निलेश राणे यांनी घेतलेल्या या तडकाफडकी निर्णयानंतर सिंधुदुर्गातील त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कट्टर समर्थक असलेले कुडाळ मधील काही नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग भाजपात एकच खळबळ उडाली आहे.
निलेश राणे यांनी सन 2009 ते 2014 या कालावधीत सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात खासदारची भूषविली होती. त्यानंतर त्यांचा सन 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या समोर सलग दोन वेळा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी गेल्या वर्षभरापासून कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी जोरदार तयारी केली होती. भाजप कार्यकर्ते त्यासाठी तयारीला लागले होते. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निलेश राणे कुडाळ – मालवण मधून आमदार व्हावेत, असे देवाकडेही साकडे घातले होते. अलिकडेच भाजप नेते तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनीही निलेश राणे यांच्या कुडाळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत काहीसे संकेत दिले होते. त्यामुळे समर्थक पदाधिकारी -कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यानंतर आज निलेश राणे यांच्या ट्विटर वरील निलेश राणे यांच्या या घोषणेनंतर सिंधुदुर्गातील त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कुडाळ-मालवण मतदारसंघातील त्यांच्या समर्थक काही पदाधिकारी लोकप्रतिनिधींनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. कुडाळ मधील राणे यांच्या दोन कट्टर समर्थक नगरसेवकांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.काही राणे समर्थक पदाधिकारी -कार्यकर्ते सिंधुदुर्ग मधून मुंबईला जाण्यासाठी मार्गस्थ झाले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button