
दापोली तालुक्यात गावठी दारू विक्रेत्यांना तीन वर्षाचा कारावास
दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भिवबंदर (ता. दापोली) येथील तिघांना दापोलीच्या दिवाणी न्यायालयाने २७ सप्टेंबर २०२३ रोजी तीन वर्षांचा कारावास ठोठावला आहे.भार्गव भिकाजी मोरे, संजय विद्याधर मोरे, उद्यकांत गोपीचंद मोरे अशी तिघांची नावे आहेत. गेल्या ४० वर्षात प्रथमच दापोलीच्या न्यायालयात दारूबंदी कायद्यांतर्गत शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दापोली तालुक्यातील दाभोळ सागरी पोलिस स्थानकातर्फे २०१८ साली ही कारवाई केली होती. त्यानंतर तब्बल ५ वर्षे दापोलीच्या दिवाणी न्यायालयात सुनावणी सुरू होती.
दापोली तालुक्यातील भिवबंदर गावातील भार्गव भिकाजी मोरे, संजय विद्याधर मोरे आणि उद्यकांत गोपीचंद मोरे हे गावठी दारूचा धंदा करत असल्याची माहिती दाभोळ सागरी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या कारवाईत मुद्देमालही हस्तगत करण्यात आला होता. त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ग) (एफ) (ई) ८१, ८३ का गुन्हा दाखल करण्यात आला होता.
www.konkantoday.com