
मांडवी येथे युवतीने गळफास लावून घेतला
रत्नागिरी शहरातील मांडवी 80 फुटी रस्त्यावरील रो हाऊस मध्ये राहणाऱ्या भूमी किशोर राठोड या सोळा वर्षाच्या युवतीने गळफास लाऊन घेतला
याबाबत कुलदीप राठोड यांनी पोलीस स्थानकात खबर दिली असून मृत झालेली तरुणी ही त्यांची लहान बहिण असुन ते मांडवी येथे 80 फुटी रस्त्यावरील रो हाऊस मध्ये कुटुंबासह राहतात कुलदीप हे आठवडा बाजार येथील आपले दुकान बंद करून भाजी खरेदीसाठी जात असता त्यांना घरातून दुसऱ्या बहिणीचा फोन आला त्यामुळे तातडीने घरी परतले त्यावेळी भूमी ही बेड रूम मध्ये सोफ्यावर पडलेली होती तर सिलिंग फॅन ला ओढणी लोंबकळत होती कुलदीप यांनी भूमी हिला तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात आणले परंतु तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले
www.konkantoday.com