
सैफी दहशदवादी असल्याचे पोलिसांकडून शिक्कामोर्तब
केरळ येथे धावत्या रेल्वेगाडीत तिघांना पेटवून दिल्याचा आरोप असलेल्या शाहरूख सैफी हा दहशतवादी असल्याचे केरळ पोलिसांकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. शाहरूख याच्यावर जिहादी उग्रवादाचा प्रभाव होता. तसेच तो पाकिस्तानी कट्टवाद्यांची भाषणे सोशल मिडियावर फॉलो करायचा. यातूनच अशा प्रकारचे कृत्य करण्याचा प्लॉन त्याने तयार केला, असे केरळ पोलिसांकडून कोची न्यायालयात सैफी याच्याविरूद्ध दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रात म्हटले आहे.
केरळ येथे ट्रेनमध्ये तिघांना पेट्रोल ओतून पेटवूनदिल्यानंतर सैफी हा रत्नागिरी येथे आला होता. सैफी याला रत्नागिरी पोलीस व केंद्रीय गुप्तचर यंत्रणा, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) संयुक्तरित्या कारवाई करत अटक केली होती. शाहरूख सैफी हा रेल्वे प्रवासादरम्यान जखमी झाला होता. यावेळी तो उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे आला होता. या ठिकाणाहून हा फरार झाला होता. रत्नागिरी रेल्वेस्थानकावर ४ एप्रिल रोजी २०२३ रोजी संशयित आरोपी शाहरूख सैफी याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. www.konkantoday.com