सायबर गुन्ह्यांविरोधात ठोस पावले उचलावीत; आमदार शेखर निकम यांची विधानसभेत मागणी.

राज्यात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेषतः ग्रामीण भागात मोबाईल फोन, इंटरनेट बँकिंग, सोशल मीडिया इत्यादी साधनांचा वापर वाढत असताना, तितक्याच वेगाने सायबर फसवणूक, आर्थिक फसवणूक, फेक अकाउंट्सद्वारे ब्लॅकमेलिंग, ओटीपी स्कॅम्ससारखे गुन्हे देखील वाढत आहेत.राज्यात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेषतः ग्रामीण भागात मोबाईल फोन, इंटरनेट बँकिंग, सोशल मीडिया इत्यादी साधनांचा वापर वाढत असताना, तितक्याच वेगाने सायबर फसवणूक, आर्थिक फसवणूक, फेक अकाउंट्सद्वारे ब्लॅकमेलिंग, ओटीपी स्कॅम्ससारखे गुन्हे देखील वाढत आहेत.मात्र, ग्रामीण भागातील नागरिकांना अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांविरोधात तक्रार कशी करावी, याची पुरेशी माहिती नसल्यामुळे ते बऱ्याचदा गोंधळतात किंवा दुर्लक्ष करतात, अशी चिंता आमदार शेखर निकम यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात व्यक्त केली.

श्री. निकम यांनी अधिवेशनात बोलताना म्हटले की, ‘सायबर गुन्ह्यांचा तपास सायबर क्राईम अधिनियम २००० व इतर संबंधित कायद्यांनुसार पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून होणे बंधनकारक आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये केवळ एकच पोलीस निरीक्षक कार्यरत असतो. त्यामुळे त्या अधिकाऱ्यावर प्रशासकीय, कायदा-सुव्यवस्थेचे आणि गुन्हेगारी तपासाचे एकत्रित ओझे येते. परिणामी, सायबर गुन्ह्यांच्या तपासात विलंब होतो.’प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर तज्ज्ञ हवाच’म्हणूनच महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस ठाण्यात एक स्वतंत्र सायबर तज्ज्ञ नेमणे ही काळाची गरज आहे. अशा तज्ज्ञांना केवळ तांत्रिक ज्ञानच नव्हे तर सायबर कायदे, डिजिटल पुरावे गोळा करणे, फॉरेन्सिक अ‍ॅनालिसिस इ. बाबतीत सखोल प्रशिक्षण दिले जावे,’ अशी मागणी श्री. निकम यांनी अधिवेशनात मांडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button