
अलसुरेतील जगबुडी नदीपात्रात तरूणाचा मृतदेह आढळला
खेड तालुक्यातील शिव-मोहल्ला येथील ३३ वर्षीय तरूणाचा अलसुरे येथील जगबुडी नदीपात्रात शनिवारी सायंकाळच्या सुमारास मृतदेह आढळला. वहिद जाफर मुकादम असे मृत तरूणाचे नाव आहे.
दोघे तरूण जगबुडी नदीकिनारी मासे पकडण्यासाठी गेला असता नदीपात्रालगत एक मानवी हात पाण्याच्या नदीपात्रालगत दिसला. याबाबत पोलीस स्थानकासह अलसुरे ग्रामस्थांना कळवल्यानंतर तातडीने घटनास्थळी पोहचले. मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर त्याच्या खिशात पाकिट सापडले. आधारकार्डवरून त्याची ओळख पटल्यानंतर नातेवाईकांना कळवण्यात आले. या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. www.konkantoday.com