सुरवात करा, सातत्य राखा आणि सफल व्हाविश्वविक्रमी मॅरेथॉन रनर आशिष कासोदेकर यांचे मनोगत


फेसबुक,इन्स्टाग्राम, रील्स आणि शॉर्ट्स च्या जमान्यात प्रेरणादायी गोष्टींची कमतरता नाहीये तर कमतरता आहे ती सुरुवात करण्याची आणि सुरवात झाल्यावर सातत्य राखण्याची

ही सुरुवात आणि हे सातत्य आपल्या दैनंदिन जीवनात आणण्याचा फॉर्म्युला काय तर आपल्या अवतिभोवती असलेल्या सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात राहणे असे विश्वविक्रमी मॅरेथॉन रनर श्री आशिष कासोदेकर यांनी Runटेल्स या कार्यक्रमात सांगितले.

रत्नागिरीकरानी, रत्नागिरीकरांची संपूर्ण जगासाठी आयोजित केलेली अशी कोकण कोस्टल मॅरेथॉन रत्नागिरी इथे ७ जानेवारी २०२४ रोजी होत आहे. धावनगरी रत्नागिरी हे या मॅरेथॉन चे घोषवाक्य आहे.
दरवर्षीच्या पहिल्या रविवारी आंतरराष्ट्रीय दर्जाचे धावपटू रत्नागिरीत येऊन धावावेत आणि रत्नागिरी धावनगरी व्हावी या सुहेतूने सुवर्णसूर्य फाउंडेशन ने या मॅरेथॉन चे आयोजन केले आहे.
दर रविवारी मॅरॅथॉन च्या प्रॅक्टिस रन देखील रत्नागिरी मध्ये होत आहेत याचाच एक भाग म्हणून विश्वविक्रमी धावपटू आशिष कासोदेकर रत्नागिरीकरांशी वार्तालाप करण्यासाठी रत्नागिरी मध्ये आले होते.

टी.आर.पी. अंबर हॉल इथे हा गप्पांचा कार्यक्रम रंगला, मैत्री ग्रुप ऑफ बिझनेस चे श्री कौस्तुभ सावंत यांनी प्रास्ताविक केले, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री अभिजित हेगशेट्ये यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कोकण कोस्टल मॅरेथॉन च्या इवेंट अँबॅसीडर सौ. विभावरी सप्रे या सुद्धा यावेळी उपस्थित होत्या.

यावेळी श्री आशिष कासोदेकर यांच्या सिंपल स्टेप फाउंडेशन तर्फे दामले प्रशाला आणि नाचणे प्राथमिक शाळेला क्रीडा साहित्याच्या किट चे वाटप करण्यात आले.

सुवर्णसूर्य फाउंडेशन चे संचालक श्री प्रसाद देवस्थळी यांनी श्री आशिष कासोदेकर यांची मुलाखत घेतली. माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, रत्नागिरी हॉटेल असोसिएशन चे उपाध्यक्ष श्री उदय लोध,लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चे ओमकार फडके,पर्यटनप्रेमी राजू भाटलेकर,शिर्के प्रशालेचे आयरे सर, रत्नागिरी रनिंग क्लब चे Advocate आशिष पावसकर, रत्नागिरी वॉकर्स क्लब चे विनय जांगळे व मित्र परिवार तसेच नवलाई ग्रुप चे फिटनेस प्रेमी सावंत कुटुंबीय आणि कोकण कोस्टल मॅरेथॉन साठी रजिस्टर केलेले १००+ धावपटू यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. रत्नागिरी सायकलिस्ट क्लब चे महेश सावंत, धीरज पाटकर, योगेश मोरे, Advocate सचिन नाचणकर, डॉक्टर नितीन सनगर, विनायक पावसकर, आरती दामले, अमित पोटफोडे, शुभम शिवलकर, श्रद्धा रहाटे, हर्षदा निमकर, मृणाल वाडेकर, अजिंक्य प्रभुदेसाई आणि कोकण कोस्टल मॅरेथॉन चे समन्वयक श्री सुहास ठाकूरदेसाई यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष मेहनत घेतली.कार्यक्रमापासून प्रेरणा घेऊन १४ जणानी On the spot मॅरेथॉन साठी रजिस्ट्रेशन केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button