बॅंकेच्या कॅशमध्ये खोट्या नोटा ठेवुन बॅंकेची फसवणुक करणा-या कॅशियरचा जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळला
रत्नागिरी:- बँकेच्या कॅशमध्ये खेळण्यातल्या खोट्या नोटा ठेवून १ लाख ६१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या कॅशियरचा
जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.
अक्षय रामचंद्र वैश्विकर (वय ३४, रा. बदलापूर,ठाणे) असे कॅशिअरचे नाव आहे. ही घटना नोव्हेंबर २०२२ ते ८ जून २०२३ या काळात घडली होती.
अक्षयने ५०० रुपयांच्या खऱ्या नोटा काढून त्यामध्ये खेळण्यातल्या नोटा बँकेत ठेवून १ लाख ६१ हजार ५०० रुपयांची डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या रत्नागिरी शाखेची फसवणूक केली होती.
बँकेने अंतर्गत चौकशी
केली असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार बँकेच्या व्यवस्थापनाने अक्षय याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अक्षय याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती. दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले
होते. या प्रकरणी अक्षयने न्यायालयात जामिन अर्ज दाखल केला होता.
जामिन अर्जावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिल अंबाळकर यांच्या न्यायलयात हि सुनावणी झाली.
www.konkantoday.com