चिपळूण तहसीलदारांच्या दालनात शॉर्टसर्किट
तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्या दालनात बुधवारी दुपारी १.१५ वाजता शॉर्टसर्किट झाले. मोठा आवाज झाल्याने हा प्रकार लक्षात आला. यामुळे वायरिंग जळले. त्याची तत्काळ दुरूस्ती करण्यात आली. तहसीलदार लोकरे हे पालकमंत्री उदय सामंत यांच्या दौर्यामुळे बाहेर असल्याने मोठा अनर्थ टळला.
येथील तहसीलदार कार्यालयाची इमारत ब्रिटीशकालीन आहे. बुधवारी दुपारी १.१५ वाजता कार्यालय इमारतीच्या मीटरजवळ मोठा आवाज झाला. तसेच तहसीलदारांच्या दालनातून धूर येवू लागला. त्यामुळे गोंधळ झाला. काहीवेळाने धूर कमी झाल्यावर अधिकारी, कर्मचार्यांनी दालनात पाहिले असता एक बोर्ड जळून खाक झाल्याचे दिसले. तसेच काही वायरींगही जळले. मात्र एसी बंद असल्याने त्याचे नुकसान झाले नाही. www.konkantoday.com