कुवारबाव ब्राह्मण पंचक्रोशी सभेतर्फे उद्या २१ ला महालक्ष्मी जागर कार्यक्रम


रत्नागिरी : कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे येत्या २१ ऑक्टोबरला अश्विन अष्टमीला महालक्ष्मीचा जागर उत्सव साजरा होणार आहे. मंडळाच्या श्रीमान यशवंत हरी गोखले भवन, साळवी स्टॉप – नाचणे लिंक रोड, हवामान खात्याशेजारी, नाचणे येथे कार्यक्रम होणार आहे. मंडळाचे महालक्ष्मी पूजनाचे सोळावे वर्ष आहे.

सकाळी ८.३० वाजता नवसुवासिनी (वशेळ्या) देवीचे पूजन करतील. सायंकाळी महालक्ष्मीचा पीठाचा मुखवटा करून पूजा करण्यात येईल. याची पूजा सायंकाळी ७.०० वाजता करण्यात येईल. घागरी फुंकणे हा या उत्सवातील महत्त्वाचा भाग असतो, तो साधारण मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत चालेल. यामध्ये सर्व महिला सहभाग घेऊ शकतात. ८ वाजता भजनाचा कार्यक्रम व मध्यंतराला आरत्या होतील. यामध्ये पुरुष, महिला सामील होतील. यात फेर धरून नृत्य, अभंग सांगणे असा कार्यक्रम आहे. सर्वांनी सायंकाळी महालक्ष्मीच्या तीर्थप्रसादाचा लाभ अवश्य घ्यावा, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी अनंत आगाशे, मोबा. ७०८३१६२९७५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button