एसटी बसस्थानकाचे पाच वर्षात १७ टक्केच काम
रत्नागिरी मध्यवर्ती एसटी बसस्थानक लवकरच पूर्ण होईल अशी आशा लागून राहिलेल्या रत्नागिरीकरांना आणखी काही वर्षे वाट पहावी लागणार आहे. सध्याचे संथगतीने चालणार्या बसस्थानकाच्या कामामुळे शासनाने जुन्या ठेकेदाराकडून काम काढून घेतले असून निविदा रद्द करण्यास प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मागील पाच वर्षात या ठेकेदाराने केवळ १७ टक्केच काम केले अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
www.konkantoday.com