
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरात जाणवला आज सकाळी भूकंपाचा धक्का
रत्नागिरी : सातारा जिल्ह्यातील कोयनानगर येथून 16 किमी अंतरावर आज मंगळवारी सकाळी 9:30 वा. चे सुमारास 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाचे धक्के नजिकच्या भागात सुद्धा चांगलेच जाणवले.
रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यात आज मंगळवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. काहीवेळ हा भुकंपाचा धक्का जाणवला. तालुक्यातील देवरूख परिसरातील गावांमध्ये देखील भूकंपाचा धक्का जाणवला.
www.konkantoday.com