प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रत्नागिरीतघर चलो अभियान, पदाधिकारी-सुपर वॉरिअर्सशी संवाद


/रत्नागिरी*- भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी ‘महाविजय 2024’ लोकसभा प्रवासात गुरुवार 19 ऑक्टोंबर रोजी ते कोकण विभागातील रत्नागिरी लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत. या प्रवासात ते लोकसभा क्षेत्रातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरिअर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील व ‘संपर्क से समर्थन’ अभियानात भाग घेणार आहेत.

रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाच्या प्रवासात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत लोकसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी व पदाधिकारी सहभागी होणार आहेत. सकाळी 10.00 वा. माळनाका रत्नागिरी येथील स्वयंवर मंगल कार्यालयात चिपळूण, रत्नागिरी व राजापूर विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी तसेच ‘सुपर वॉरिअर्स’ यांच्याशी संवाद साधतील. दुपारी 12.00 वा. रत्नागिरी येथे श्री राम मंदिर ते वीर सावरकर चौक पर्यंत ‘घर चलो अभियानात’ सहभागी होतील. यादरम्यान ते जैन मंदिर व राम मंदिरात दर्शन घेणार आहेत. या प्रवासात ते नाणीजधाम येथील जगदगुरु नरेंद्राचार्य महाराजांची भेट घेणार आहेत.

दुपारी 03.45 वा. कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरिअर्स व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. सायं. 06.00 वा. कणकवली बाजारपेठ ते हायवे भाजपा नवरात्रौत्सव मंडळापर्यंत घर चलो अभियानात सहभागी होतील व सर्वसामान्य जनतेशी हितगुज करतील. सायं. 08.15 वा. सावंतवाडी येथे विधानसभा संपर्क कार्यालय व वॉर रूमचे उद्घाटन करतील.

प्रदेश अध्यक्षांच्या प्रवासाचे नियोजन व तयारी केंद्रीय मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, राज्य लोकसभा प्रवास संयोजक संजय (बाळा) भेगडे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा समन्वयक अतुल काळसेकर, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, रत्नागिरी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने, प्रमोद अधटराव, उल्का विश्वासराव, मनोज रावराणे, राजन तेली, उमेश देसाई, सुशांत पाटकर, विक्रम जैन, राजू भाटलेकर, राजन फाळके, संदीप सुर्वे, मंदार मयेकर, मंदार खंडकर, विनोद भागवत, संतोष कानडे, संदीप साटम, अण्णा कोदे, समीर नलावडे, संदेश सावंत, प्रथमेश तेली यांच्यासह सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी व सर्व प्रमुख पदाधिकारी व जिल्हा कार्यकारिणीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते करीत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button