जिल्हा उद्योग मित्र समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून डॉ प्रशांत पटवर्धन, राजेंद्र सावंत, केशव भट यांची नियुक्ती
रत्नागिरी जिल्हा उद्योग मित्र समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून डॉ प्रशांत पटवर्धन, राजेंद्र सावंत, केशव भट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या आदेशावरून जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी नेमणुकीचे पत्र दिले आहे.
उद्योजकांना जमीन, पाणी, वीज, आर्थिक सहाय्य व इतर संविधानिक परवाने, निपटारा प्रमाणपत्र, अनुज्ञप्ती, ना हरकत प्रमाणपत्र इत्यादी मिळवण्याकरता संबंधित असलेल्या निरनिराळ्या संस्थांचा समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातून व नवीन प्रस्थापित होणाऱ्या उद्योगांना जलद गतीने मदत होण्याच्या दृष्टीकोनातून उद्योग मित्र समितीची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधीकारी यांच्या अध्यक्षते खाली ही समिती काम करणार आहे.
पत्रकार असलेले डॉ. प्रशांत पटवर्धन फेडरेशन ऑफ रत्नागिरी डीस्टीक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे अध्यक्ष आहेत. लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशन चे आठ वर्ष अध्यक्ष व तेरा वर्ष संचालक म्हणून काम करीत आहेत.
राजेंद्र (राजू)रामचंद्र सावंत फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्टिक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत.रत्नागिरी मण्यू फ्रॅक्चरिंग असोसिएशन चे १९८४ पासून सेक्रेटरी म्हणून काम पहात आहे.
केशव भास्कर भट यांनी एमआयडीसी मध्ये ३० वर्ष उप अभियंता म्हणून काम केले असून फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्टिक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे सेक्रेटरी म्हणून काम करीत आहेत.
फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज संस्थेची स्थापना करून उद्योजकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी हे तिघ विशेष प्रयत्न करीत आहेत. उद्योग मंत्री ना उदय सामंत यांनी या तिघांचे अभिनंदन केले आहे.
उद्योजक दीपक गद्रे, कॅप्टन दिलीप भाटकर, राजू जोशी,लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष राज आंब्रे, फेडरेशन चे उपाध्यक्ष धनंजय यादव, विश्वास जोशी, राजेश पल्लोड, चिपळूणचे अध्यक्ष अनिल त्यागी, गुहागर चे प्रसाद वैद्य. राजापूर चे सिराज साखरकर दापोलीचे नरवणकर यांनी या तिघांचे अभिनंदन केले आहे
www.konkantoday.com