
चिपळुणात ९ हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा
पेईंगगेस्टच्या नावाखाली हॉस्टेलवर रूम देतो, असे सांगून एकाने ९ हजार ६७ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना ६ ऑक्टोबर रोजी शहरातील मार्कंडी येथे घडली. या प्रकरणी फसवणूक करणार्यावर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुमार गुप्ता असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार फिर्यादी त्यांच्या मुलीला मुंबई येथे राहण्यासाठी मोबाईलवरून वेबसाईटद्वारे पेईंगगेस्ट प्रकारात रूम शोधत होत्या. यावेळी कुमार गुप्ताने त्याच्या मोबाईल नंबरवरून निशान पेईंगगेस्टच्या नावाखाली त्यांच्या दिलेल्या युपीआयडी नंबरवरून वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांसाठी ४००० रूपये, २५६० रू. २५०७ रू. असे ९ हजार ६७ रू. ऑनलाईन गुगल पेद्वारे युपीआय आयडीवर ट्रान्सफर करून फिर्यादी यांची फसवणूक केली. www.konkantoday.com