एखाद्या महामंडळात किंवा एखाद्या विभागात काय चमत्कार होवू शकतो, हे राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने दाखवून दिले-उद्योगमंत्री उदय सामंत
एसटी महामंडळ नफ्यात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षानुवर्षे तोट्यात चालणार्या एसटी महामंडळाला प्रत्यक्ष मैदानात उतरून आधार दिला आहे. एखाद्या महामंडळात किंवा एखाद्या विभागात काय चमत्कार होवू शकतो, हे राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने दाखवून दिले आहे. देशामध्ये फक्त सहा राज्यांमधील एसटी महामंडळे ही फायद्यात चालली असून उर्वरित सर्व तोट्यात सुरू आहेत. मुळात एसटी महामंडळ हे स्वतंत्ररित्या चालणारे महामंडळ असल्याने सरकारकडून काही वेळा त्यांना आर्थिक मदत केली जात असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
सामंत म्हणाले की, मागील २ ते ४ वर्षात कोविड काळात लक्ष न दिल्याने हे महामंडळ तोट्यात चालले होते. अगदी कर्मचार्यांचे पगार देण्याइतके देखील एसटी महामंडळाकडे पैसे नव्हते. अशा परिस्थितीतून महामंडळाला सावरणे ही मोठी कसरत होती. पण अशा बिकट परिस्थितीतून शिंदे-फडणवीस व पवार सरकारने अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या बाहेर काढले. वर्षानुवर्षे तोट्यात असलेले एसटी महामंडळ नफ्यात आणून, सक्षम व सकारात्मक पद्धतीने काम करण्याची इच्छा असेल तर एखाद्या तोट्यात असलेल्या संस्थेचाही कायापालट करता येतो, हे शिंदे-फडणवीस-पवार सरकारने दाखवून दिले.
www.konkantoday.com