
आंबाघाटातील गोमुखातील पाण्याचा प्रवाह बंद
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी -कोल्हापूर महामार्गवरील रोज शेकडो वाहनधारकांची व येणाऱ्या पर्यटकांची तहान भागविणारे भाविकांचे श्रद्धास्थान व गेली अनेक वर्षे अविरतपणे बारमाही वाहणारे आंबा घाटातील गायामुखतील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बंद झाला आहे.
२४ जून २०२३ ला आंबा घाटातील गायमुखा शेजारी असलेल्या डोंगरातील भला मोठा दगड तेथे असलेल्या गायमुख व त्यावर असलेल्या गणेश मंदिरावर कोसळल्याने मंदिराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र त्याही परिस्थितीत गायमुखातील पाण्याचा प्रवाह सुरु होता.
रत्नागिरी कोल्हापूर मार्गांवरील गायमुख व त्यावरील गणेश मंदिर स्वयंभु संकटमोचक हनुमान यांना वंदन करूनच वाहन चालक पुढे जातात
मात्र कोसळलेला दगडाचा भराव व पाला पाचोळा साफ केला तर पुर्ववत होइल अशी शक्यता अनेकानी वर्तवली जात आहे
www.konkantoday.com