अरबी समुद्रात आता तेज चक्रीवादळ, मुंबई, कोकणाला धोका नाही
आग्नेय अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा तीव्र होत आहे, यातून २२ आणि २३ तारखेला चक्रीवादळाची निर्मिती होईल. पण या चक्रीवादळाचा मुंबई आणि पश्चिम किनारपट्टीला फटका बसणार नाही. स्कायमेट या हवामानविषय संस्थेने दिलेल्या बातमीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या चक्रीवादळाला ‘तेज’ असे नाव देण्यात येणार आहे.
स्कायमेटने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे, ‘हे चक्रीवादळ येमेन आणि सलालाहच्या दिशेने जात आहे. तेथे २३ तारखेला ते किनारपट्टीला धडकेल.’
२०२३च्या मान्सूननंतर अरबी समुद्रात निर्माण झालेले हे पहिले चक्रीवादळ आहे. यापूर्वी १६ जूनला बिपरजॉय या चक्रीवादळाने तडाखा दिला होता. हे चक्रीवादळ ईशान्य दिशेला जाईल, येमेन आणि ओमानला याचा फटका बसू शकतो. त्यानंतर हे वादळ पुन्हा समुद्रात येऊन पाकिस्तानच्या दिशेने सरकू शकते, असे स्कायमेटने म्हटले आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने मच्छिमारांना पूर्वपश्चिम आणि लक्षद्विपच्या समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे.
. या चक्रीवादळाच्या मार्गाबद्दल हवामान खात्याला अजूनही निश्चित माहिती नाही. तसेच याचा मुंबईवर नेमका कसा परिणाम होईल याची निश्चिच माहिती नाही, असे Daily-Oने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. २१ ऑक्टोबरला कमी दाबाचा पट्टा मध्य अरबी समुद्रात तीव्र होईल. त्यानंतर याची निर्मिती चक्रीवादळात होईल.
महाराष्ट्र आणि दक्षिण गुजराच्या किनारपट्टीवरील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याबद्दल सूचना देण्यात आल्या आहेत.
. किनारपट्टीवरील नागरिकांनी हवामानसंदर्भातील सूचनांवर लक्ष ठेवावे.
www.konkantoday.com