
हातखंबा येथील पुलावर कंटेनर आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक, अपघातात एकाचा मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील पुलावर कंटेनर आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.ही घटना आज (दि. 18 ) सायंकाळी 6.45 वा. घडली.
राजन बाबल्या डांगे (40, रा. हातखंबा, रत्नागिरी ) हा लाद्याची वाहतूक करणाऱ्या आयषर टेम्पोच्या हौद्यात बसलेला होता. या अपघातामुळे त्याच्या अंगावर लाद्या पडून त्याचा मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.या अपघातामुळे वाहतूक खोळंबली असून अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्याना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु होते.
www.konkantoday.com