सर्वसामान्यांना आता वीज दरवाढीचा शॉक बसणार


ऑक्टोबर हीटचे चटके सोसणाऱया सर्वसामान्यांना आता वीज दरवाढीचा शॉक बसणार आहेत. महावितरणने उन्हाळय़ात जादा दराने खरेदी केलेल्या विजेचा इंधन अधिभार वसूल करण्यास याआधीच वीज आयोगाने मंजुरी दिली आहे.त्यानुसार महावितरणने मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यातील इंधन अधिभार सप्टेंबरपासून पुढील तीन महिन्यांत वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार घरगुती वीज ग्राहकांच्या प्रतियुनिट विजेच्या दरात 15 ते 35 पैसे एवढी मोठी वाढ लागू केली जाणार आहे. त्यामुळे चालू महिन्यात हातात पडणारे वीज बिल वाढवून येणार असल्याचे निश्चित झाले आहे.

महावितरणकडून राज्यभरातील सुमारे पावणेतीन कोटी वीज ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. सदर विजेचे दर वीज आयोगाने याआधीच निश्चित केले असले तरी वीजनिर्मिती करताना वापरण्यात येणाऱया इंधनाच्या दरात वाढ झाल्यास त्याच्या फरकाची रक्कम इंधन अधिभाराच्या माध्यमातून वसूल केली जाते. त्यानुसार महावितरणने उन्हाळय़ातील तीन महिन्यांच्या एफएसीचा भार घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि कृषिपंपधारकांवर टाकण्याचा निणय घेतला आहे. सदरचा एफएसी सप्टेंबरच्या वीज वापरावर म्हणजे आता येणाऱया बिलात दिसणार आहे. त्यामुळे आधीच वाढीव वीज बिलाने हैराण झालेल्या वीज ग्राहकांच्या खिसा कापला जाणार आहे.
www. konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button