
श्रीराम मंदिराच्या नवरात्र उत्सवात पूर्णगडच्या श्री दत्त माऊली ग्रुपचे बहारदार टिपरी नृत्य
रत्नागिरी (प्रतिनिधी) : ऑक्टोबर रत्नागिरी येथील प्रसिद्ध श्रीराम मंदिरातील श्रीदेवी तुळजाभवानी देवस्थानात नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पूर्णगड येथील श्री दत्त माऊली ग्रुपने छोट्या बाल कलाकारांच्या टिपरी नृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
पूर्णगडच्या श्री दत्त देवस्थानचे श्री सूर्यकांत लाकडे आणि श्री. संकेत लोकरे यांनी त्यांच्या सहकारी वाद्य वृंदासह आकर्षक ठेक्यात विविध भक्ती गीतांच्या तालावर टिपरी नृत्य सादर केले. या पथकाला श्रीराम मंदिर जेष्ठ नागरिक कट्टाचे खजिनदार श्री रमाकांत पांचाळ यांनी प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केले.
www.konkantoday.com