रत्नागिरी रेल्वेस्थानकाला प्रा. मधु दंडवतेंचे नाव देण्याची मागणी
कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे नाव रत्नागिरी रेल्वेस्टेशनला देण्यात यावे, या मागणीसह अन्य प्रमुख मागण्यांबाबतचे निवेदन प्रा. मधु दंडवते स्मारक समितीच्यावतीने कोकण रेल्वेचे मॅनेजिंग डायरेक्टर, चेअरमन यांना सादर करण्यात आले आहे. २६ जानेवारी २०२४ पर्यंत मागण्यांबाबत अंमलबजावणी न केल्यास आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व रेल्वेस्थानक येथे लाक्षणिक धरणे, उपोषण, आंदोलन केले जाईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
हे निवेदन आडवली रेल्वेस्टेशन यांच्यामार्फत कोकण रेल्वेचे चेअरमन कोकण रेल्वे कॉर्पोरेशन बेलापूर, नवी मुंबई यांना सादर करण्यात आले आहे.
www.konkantoday.com