मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहाद्दूरशेख नाका उड्डाणपूल दुर्घटनेमध्ये कोट्यवधींची हानी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहाद्दूरशेख नाका येथे सुरू असलेल्या उड्डाणपूल दुर्घटनेत सोमवारी ३० गर्डर खाली कोसळले. या अपघातात लॉंचर व २५ गर्डर तुटून कोट्यवधी रूपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान काम बंद ठेवण्यात आल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
उड्डाणपुलाच्या दोन पिलरमध्ये एकूण १५ गर्डर बसवले जातात. उड्डाणपुलाचे गर्डर हायड्रोलिक सिस्टिमने बसविण्यासाठी लॉंचरचा उपयोग केला जाते. या लॉंचरची किंमत सुमारे साडेतीन कोटी इतकी आहे. सोमवारच्या दुर्घटनेत लॉंचर मधोमध तुटला असून ठिकठिकाणी तो वाकला आहे. तसेच २५ गर्डर पूर्णपणे तुटले आहेत. साधारणतः एका गर्डरसाठी ८० टन लोखंड वापरले जाते. सद्यस्थितीत बाजारात ७० रुपये किलो दराने स्टीलची विक्री सुरू आहे. त्यामुळे लॉंचरसह २५ गर्डरचे सुमारे १५ कोटींचे नुकसान झाले.
www.konkantoday.com