मुंबई-गोवा महामार्गावरील कांटे ते वाकेड टप्प्यावरील कामासाठी नेमलेल्या कंत्राटदाराने आर्थिक बाबींची सबब देत काम केले बंद
मुंबई-गोवा महामार्गावरील कांटे ते वाकेड टप्प्यावरील कामासाठी नेमलेल्या कंत्राटदाराने आर्थिक बाबींची सबब देत हात वर केले आहेत. या कंत्राटदाराच्या जागी नवीन कंत्राटदार नेमण्यात आला आहे. महामार्गाच्या एकूण १० टप्प्यातील कामात सर्वाधिक वेळ लागलेला टप्पा म्हणून कांटे ते वाकेड टप्प्याचा उल्लेख केला जात आहे. अशातच या टप्प्यासाठी चिपळूणच्या ईगल कंपनीला नवीन कंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळे आता तरी या टप्प्यातील कामाला वेग येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६, मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम गेली १० वर्षे सुरू आहे. या कामासाठी नेमलेल्या रोडवेज सल्युशन कंपनीच्या अंतर्गत हॅन इन्फ्रा ही कंपनी काम करत आहे. या कंपनीने आजपर्यंत केलेल्या कामांची पेमेंट अदा करणे, हा सर्वात जटील प्रश्न झाला आहे. सद्यस्थितीत काम करत असलेला कंत्राटदाराच्या नावावर पूर्ण झालेल्या कामांची पैसे अदा न होता हे पैसे मुख्य कंपनीच्या म्हणजेच रोडवेज सल्युशन कंपनीच्या नावाने अदा होत आहेत. सध्या ही कंपनी मुंबई-गोवा महामार्गावरील आरवली ते वाकेड या टप्प्यासाठीही काम करत आहे. www.konkantoday.com