तोटय़ातील ‘एसटी’ला सावरण्यासाठी चर्चा करण्याकिरता एसटीतील सगळय़ाच २५ कामगार संघटनांना बैठकीचे आमंत्रण

दिवाळीच्या बोनसपासून विविध भत्ते व वेतनाबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आणि विविध कामगार संघटनांतील संघर्ष सर्वश्रूत आहे. आता महामंडळाने तोटय़ातील ‘एसटी’ला सावरण्यासाठी चर्चा करण्याकिरता एसटीतील सगळय़ाच २५ कामगार संघटनांना बैठकीचे आमंत्रण दिले आहे.एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी दोन वर्षांपूर्वी कामगारांनी पन्नास दिवसांहून जास्त काळ संप पुकारला होता. एसटीची आर्थिक स्थिती ढासळली होती. आता एसटी पूर्वपदावर येत आहे. एसटी महामंडळात आताही मान्यताप्राप्त आणि इतर संघटनांकडून कामगारांचे विविध प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिला जातो. त्यावर कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी एसटी महामंडळाने महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनांसह २५ संघटनांना ३० ऑक्टोबरला मुंबईत बैठकीचे आमंत्रण दिले आहे.बैठकीमध्ये सगळय़ाच संघटनांकडून एसटीतील शिस्त व आवेदन कार्यपद्धतीमध्ये सुधारणासह इतर गोष्टींबाबत मत जाणून घेतले जाणार आहे. तर अपहार प्रणव बदल्या रद्द करणे, कामगारांविरुद्ध प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे मागे घेणे, विश्रांतीगृहात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करणे, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारच्या एस.टी. बसेसमध्ये मोफत पासची सवलत लागू करणे, सेवानिवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांऐवजी एक वर्षांचा मोफत पास सर्व प्रकारच्या गाडय़ांमध्ये उपलब्ध करण्याबाबत मत या संघटनांकडून जाणून घेतले जाणार असल्याची माहिती आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button