
खेड तालुक्यातील सवेणीतून बीएसएनएलचे दीड लाखांचे साहित्य चोरीला
खेड तालुक्यातील सवेणी येथून भारत दूरसंचार निगम लिमिटेडच्या १ लाख ५७ हजार ३६८ रूपयांच्या किंमतीचे मोबाईल टॉवरचे साहित्य चोरट्याने लंपास केले. त्यानुसार येथील पोलिसांत अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या बाबत येथील बीएसएनएलच्या कार्यालयाचे कार्यकारी अभियंता संजय तिडके यांनी येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. सवेणी येथे उभ्या करण्यात आलेल्या टॉवरच्या बाजूला असलेल्या इमारतीच्या मुख्य दरवाजाची कडी तोडून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला. इमारतीतील खोलीत मोबाईल टॉवरच्या नेटवकसाठी ठेवण्यात आलेले साहित्य व बॅटर्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली. www.konkantoday.com