सेजेस चे प्रसिद्धी प्रमुख  शरद हळबे यांचे अल्पशा आजाराने निधन

सेवानवृत्तांची जनसेवा समिती रत्नागिरी या संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख आणि माहिती व जनसंपर्क विभागातील सेवानिवृत्त लेखापाल श्री शरद यशवंत हळबे यांचे दिनांक 16 ऑक्टोबर रोजी रात्री अल्पशा आजाराने खाजगी रुग्णालयात निधन झाले त्यांच्यावर आज मजगाव रोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले निधन समई ते 82 वर्षांचे होते.

श्री हळबे यांनी रत्नागिरी येथील जिल्हा माहिती कार्यालयातून आपल्या शासकीय सेवेचा प्रारंभ केल्यानंतर पणजी येथील महाराष्ट्र परिचय केंद्र कोल्हापूरचे विभागीय माहिती कार्यालय येथे सेवा केली पदोन्नतीनंतर कोकण विभागीय माहिती कार्यालयातून ते लेखापाल या पदावरून सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्तीनंतर हळबे यांनी सेवा निवृत्तांची जनसेवा समिती तसेच रत्नागिरी शहर यशवंत नागरिक प्रसिद्धी प्रमुख म्हणून भरीव कार्य करून या संस्थांना आर्थिक देणग्या मिळवून दिल्या तसेच सेवानिवृत्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी मोलाची मदत केली त्यांच्या पश्चात पत्नी मुलगी जावई व नातू असा परिवार आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button