
रत्नागिरीत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयसिंग उर्फ आबा घोसाळे यांचा शिंदे गटात प्रवेश
आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असल्याचं दिसून येत आहे. रत्नागिरीमध्ये शिवसेनेचेमाजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयसिंग उर्फ आबा घोसाळे यांनी आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उदय सामंत म्हणाले की, आबा घोसाळे हे कट्टर शिवसैनिक आहेत. कोकणातील ग्रामपंचायत निवडणूकीत पहिल्यांदा शिवसेना निवडून आली त्याचं सगळं श्रेय आबा घोसाळे यांना जातं. रत्नागिरीतील ग्रामपंचायतीत शिवसेना येण्यामागे आबांचा मोलाचा वाटा होता. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आबांनी शिवसेना पक्ष वाढावा यासाठी जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्यासारखं हरहुन्नरी व्य़क्तीमत्त्व आज महायुतीत प्रवेश करत आहे याचा अत्यंत आनंद होत आहे. अशा शब्दात उदय सामंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.