रेल्वे प्रवासात एक डुलकी प्रवाशाला चांगलीच महागात पडली, रेल्वेत साडेपाच लाखाचा ऐवज लंपास
रेल्वे प्रवासात झोपलेल्या प्रवाशाकडून चोरट्याने चांगलाच फटका दिला चोरट्याने प्रवाशाच्या जवळील ५ हजार ५४ हजारांचा ऐवज चोरल्याची घटना १६ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट दरम्यान घडली.
पोलिसांकडून प्राप्त सविस्तर माहितीनुसार १६ ऑगस्ट २०२३ ते १७ ऑगस्ट दरम्यान फिर्यादी महिला या त्यांच्या पती, बहिण, भावोजी, बहिणीचा मुलगा असे मिळून केरळ येथे लग्नासाठी पुणे एर्नाकुलम सुपरफास्ट एक्स्प्रेस क्र. २२१५० मधून प्रवास करत होत्या. दरम्यान त्यांची ट्रेन भोके रत्नागिरी येथे आलेली असताना सर्वजण रेल्वे प्रवासादरम्यान गाढ झोपी गेलेले होते. याचाच फायदा चोरट्याने घेतला व फिर्यादी यांच्याजवळील हॅण्डबॅगवर डल्ला मारत ही चोरी केली, असे पोलिसांनी सांगितले.
या चोरीच्या घटनेत २ लाख २८ हजार किंमतीचे सोन्याचे दागिने ज्यात बांगड्या, ब्रेसलेट, सोन्याचे पेंडल, कानातील जोड, सोन्याची व डायमंडची अंगठी, सोन्याच्या अंगठ्या याचा समावेश होता. तसेच ३ लाख १० हजार रुपये किंमतीचा १ प्लस कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईलचा देखील समावेश होता.
www.konkantoday.com