
राज्य नाट्य स्पर्धेच्या ऑनलाईन प्रवेशिकेसाठी आवाहन
रत्नागिरी शहराच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने ३ जानेवारी २०२४ पासून सुरू होणार्या हौशी हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धेसाठी नाट्यसंस्थांकडून १२ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेशिका मागवण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी दिली.
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगुंटीवार व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे चवरे यांनी नमूद केले आहे. २० व्या बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी ३ जानेवारी २०२४ पासून विविध १० केंद्रांवर तर ६२ व्या हौशी, हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी प्रत्येकी एका केंद्रावर १५ जानेवारी २०२४ पासून आयोजित करण्यात येणार आहे.
नोदणीकृत हौशी नाट्यसंस्थांना तसेच गतवर्षी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्यसंस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका नियम संचालनालयाच्या https://mahanatyaspardha.com या वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रवेशिका ६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन सादर कराव्यात. विहित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत.
www.konkantoday.com