महादेव अ‍ॅपचा संचालक अटकेत; ‘लुकआऊट सर्क्युलर’च्या आधारे मुंबई विमानतळावर कारवाई

मुंबई : महादेव बुक बेटिग अ‍ॅपचा संचालक मृगांक मिश्राला मुंबई विमानतळावरून रविवारी अटक करण्यात आली. मिश्रा दुबईतून अ‍ॅपचे कामकाज चालवत होता. त्याच्याविरोधात लुकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले होते.
त्याआधारे दुबईवरून मुंबई विमानतळावर आल्यावर आरोपीला पकडण्यात आले. राजस्थान पोलिसांना त्याचा ताबा देण्यात आला आहे. मिश्राच्या अटकेची माहिती सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) देण्यात आली आहे. आरोपीवर ९० बनावट बँक खाते बनवल्याचा आरोप आहे. त्यात दोन हजार कोटींचे व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मिश्रा हा महादेव अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी आहे. मिश्रा मूळचा मध्य प्रदशातील रतलान येथील रहिवासी आहे. गेल्या काही दिवसांपासून तो दुबईमध्ये लपला होता. तेथून तो इतर आरोपींच्या मदतीने महादेव बुक बेटिंग अ‍ॅप चालवत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. राजस्थानमधील प्रतापगड पोलीस ठाण्यातही बनावट नावाने बँक खाती उघडून कोटय़वधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल होता. याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी त्याच्याविरोधात लुक आऊट सक्र्युलर (एलओसी) जारी केले होते. त्या एलओसीच्या आधारावर दुबईवरून मुंबई विमानतळावर आल्यावर त्याला रविवारी थांबवण्यात आले. त्यानंतर राजस्थान पोलिसांना त्याचा ताबा देण्यात आला. ईडीमध्येही मिश्राचा शोध घेत असल्यामुळे या अटकेबाबतची माहिती राजस्थान पोलिसांकडून ईडीला देण्यात आली. याप्रकरणी आरोपी २१ ऑक्टोबपर्यंत राजस्थान पोलिसांच्या कोठडीत आहे. तेथून न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानतंर ईडी मिश्राचा ताबा घेण्याची शक्यता आहे.

ईडीने मेसर्स महादेव ऑनलाइन बुक बेटिंग अ‍ॅपसंबंधित प्रकरणात कोलकाता, भोपाळ व मुंबई येथील ३९ ठिकाणी छापे टाकले होते. याप्रकरणी सुमारे ४१७ कोटी रुपये किमतीची मालमत्ता गोठवण्यात अथवा जप्त करण्यात आली होती. याप्रकरणी अभिनेता रणबीर कपूर, अभिनेत्री हुमा कुरेशी, श्रद्धा कपूर यांच्यासह १२ हून अधिक तारांकित कलाकार, खेळांडू या ॲपच्या समाजमाध्यांवर जाहिरात केली आहे. त्याप्रकरणी रणबीर कपूर, हुमा कुरेशी, श्रद्धा कपूर यांना ईडीने समन्स पाठवले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button