
भोस्ते घाटात ट्रक दुचाकी अपघातात ,युवकाचा दुर्दैवी मृत्यू
खेड १७:- मुंबई गोवा महामार्गा वरील भोस्ते घाटात ट्रकच्या धडकेत २६ वर्षीय तरुण दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली हा अपघात सांयकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घाटातील अवघड वळणावर घडला. शुभम सुदाम काणेकर रा. मोरवंडे सुतारवाडी असे त्या मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे .यातील दुचाकी स्वार शुभम काणेकर हा आपल्या ताब्यातील दुचाकीने मोरवंडे येथे जात असताना भोस्ते घाटा च्या अवघड वळणावर पुढे असलेल्या ट्रक ची धडक दुचाकीला बसल्याने दुचाकी स्वार काणेकर हा गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ भरणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचारादरम्यान सुरू असताना सांयकाळी त्याची प्राणज्योत मालवली मोरवंडे गावचे ग्रामस्थ सुदाम काणेकर याचे द्वितीय पुत्र शुभम सुदाम काणेकर, हा , अतिशय कमी कालावधीत आपल्या इंटेरियर डिझाईन च्या कामामुळे संपूर्ण तालुक्यातील बिल्डर लोकांना आकर्षित केलेला, अतिशय मेहनत व जिद्दीच्या जोरावर आपल्या कुटूंबाची गरिबीची परिस्थिती दूर करण्यासाठी झटत होता.
www.konkantoday.com