
देवरुख मधील मुदत संपलेले अनधिकृत बॅनर, फलकावर ग्रा.पं.ने कारवाई करावी
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने देवरूख पोलीस यंत्रणेनेने पावले उचलली आहेत. बॅनर, फलक लावताना ग्रामपंचायतीची परवानगी घेण्यात यावी व संबंधितांनी दिलेल्या मुदतीत फलक पुन्हा काढावेत. नियमाचे उल्लंघन करणार्यांवर कारवाईचाा बडगा उगारण्यात यावा, अशा मागणीचे पत्र देवरूख पोलीस ठाण्याच्यावतीने कार्यक्षेत्रातील ६० ग्रामपंचायतींना देण्यात आले आहे.
संगमेश्वर तालुक्यातील पुर्येतर्फे देवळे येथे लावण्यात आलेले बॅनर अज्ञात इसमाने फाडून नुकसान केले. देवरूख पोलीस ठाण्यात या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. धार्मिक सणांच्या अनुषंगाने प्रत्येक गावात शुभेच्छा देणारे फलक, बॅनर, झेंडे सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले आहेत. ठिकठिकाणी बॅनर्स, फलक, झेंडे लावण्यावरून दोन गटात तेढ निर्माण होतात. परिणामी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.
www.konkantoday.com