दारूच्या नशेत पुतण्याची चुलत्याला लोखंडी रॉडने मारहाण

राजापूर तालुक्यातील कोतापूर चर्मकार वाडी येथे दारूच्या नशेत पुतण्याने चुलत्याला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली आहे. रविवारी १५ ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला असून या प्रकरणी राजापूर पोलिसांनी जितेंद्र गुणाजी कोतापकर यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.त्याला राजापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

जितेंद्र कोतापकर याच्याविरोधात यापुर्वी वारंवार तक्रारी करूनही पोलीसांनी कोणतीच दखल न घेतल्याने पुन्हा हा जीवघेणा हल्ल्याचा प्रकार घडल्याचा आरोप प्रकाश कोतापकर यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
कोतापूर चर्मकार वाडी येथील रहिवाशी असलेले जितेंद्र कोतापकर व प्रकाश कोतापकर हे नात्याने चुलते पुतणे असून, त्यांच्यात गेली अनेक वर्षे वाद सुरू आहे. रविवारी सायंकाळी जितेंद्र दारू पिऊन आला होता. त्याने प्रकाश कोतापकर यांना दारूच्या नशेत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. याबाबत प्रकाश कोतापकर यांनी विचारणा केली असता त्याने लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत प्रकाश कोतापकर यांच्या डोक्याला आणि डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली व ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने राजापूर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button