चला नदीला जाणूया या अभियानांतर्गत राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीचे पुजन व आरती

शासनाच्या चला नदीला जाणूया या अभियानांतर्गत राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीचे पुजन व आरती करण्यात आली. यावेळी नदीपात्रात सोडलेले दिवे, त्या समवेत नदीचे महत्व विषद करताना तिची स्वच्छता, पावित्र अबाधित राखण्यासाठी घेतलेली सामुदायिक प्रतिज्ञा यामुळे रायपाटण संगनाथेश्‍वर परिसरातील अर्जुना नदीचा घाट भक्तीमय व उजळून गेला होता.  तर अर्जुना नदीच्या जयजयकाराने  वातावरण मंगलमय बनले होते.
शासनाच्या या अभियानात लोकसहभाग वाढावा या हेतूने पवित्र अर्जुना नदीविषयी प्रबोधन करण्याच्या दृष्टीने राजापूर, लांजा नागरिक संघाने अर्जुना नदीपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला उदंड प्रतिसाद लाभला. नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button