
राज्यातील दीड हजार शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्यात शैक्षणिक दर्जा ढासळला असून शासनामार्फत अनेक समस्या निर्माण केल्या जात आहेत. काही शिक्षक 2012 पासून सेवा अनुदानित शाळेत अध्ययनाचे काम करीत आहेत. त्यांना अद्यापही वैयक्तिक मान्यता व वेतन अदा केलेले नाही, असा आरोप केला जात आहे. अनेक शिक्षकांवर उपासमारी, आत्महत्येची वेळ आली आहे. असे राज्यात एक ते दीड हजार शिक्षक आहेत. त्यांना 10 ते 12 वर्षे होऊन गेली तरी मान्यता मिळालेली नाही. शिक्षण खात्याची उदासीनता याला कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी, तातडीने पीठासनाकडून न्याय मिळवून आलेले शिक्षक त्यांनी व्यक्तिगत मान्यता देऊन वेतन आय. डी. क्रमांक द्यावेत, अशी मागणी ज्येष्ठ शिक्षक नेते व हिंदी महामंडळाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी यांनी राज्य शासनाकडे केली
आहे.