कोकण मार्गावर १८ रोजी तीन तासांचा मेगाब्लॉक

कोकण मार्गावरील आडवली-राजापूर रोड व राजापूर-नांदगाव रोड विभागादरम्यान १८ ऑक्टोबर रोजी ३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत आडवली-राजापूर तर सकाळी ७.४० ते १०.४० या वेळेत राजापूर -नांदगाव रोड विभागादरम्यान मालमत्ता देखभालीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे २ रेल्वेगाड्याच्या सेवांवर परिणाम होणार आहे.
या मेगाब्लॉकच्या पार्श्‍वभूमीवर ११००३ क्रमांकाची दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस १८ ऑक्टोबर रोजी २ तास १५ मिनिटे तर रोहा-रत्नागिरी विभागादरम्यान थांबवण्यात येणार आहे. याच दिवशी १०१०६ क्र. ची सावंतवाडी-नांदगाव रोड विभागादरम्यान १ तास १५ मिनिटे रोखून धरण्यात येणार आहे. या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button