
काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक सुरेश कातकर यांची महाड विधानसभा क्षेत्र प्रभारी पदी नियुक्ती
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मान. प्रांत अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून रत्नागिरी जिल्हा समन्वयक सुरेश कातकर यांची 164 – महाड विधानसभा मतदारसंघ विधानसभा क्षेत्र प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, रायगड जिल्हा अध्यक्ष महिंद्र घरत यांचे नियुक्तीचे पत्र नुकतेच सुरेश कातकर यांना प्राप्त झालेले आहे. सुरेश कातकर यांची 164 – महाड विधानसभा मतदारसंघाच्या विधानसभा क्षेत्र प्रभारी पदी नियुक्ती झाल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे रमेश कीर, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग, काँग्रेसचे गुहागर तालुकाध्यक्ष गजानन जाधव यांनी सुरेश कातकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.




