राज्यात किनारपट्टीवर लवकरच लुटा फ्लोटेल्स, हाउसबोट्स, सीप्लेन, पाण्यावर धावणाऱ्या बसचा आनंद लुटता येणार


राज्याच्या ७२० किमीच्या समुद्र किनारपट्टीवर लवकरच बंदर विकासासह विविध उद्योगांची उभारणी दिसणार असून त्यांच्या विकासासाठी जलवाहतूक, रो-रो सेवा आणि फ्लोटेल्स, हाउसबोट्स, सीप्लेन, पाण्यावर धावणाऱ्या बसचा आनंद लुटता येणार आहे. याशिवाय पर्यटकांना समुद्र भ्रमणासह मनोरंजनासाठी मासेमारी करता येणार आहे. महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाने यासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील किनारपट्टीवर उपरोक्त क्षेत्रात सेवा देण्यासाठी जे इच्छुक आहेत, अशा उद्योजकांकडून मेरी टाइम बोर्डाने ११ जानेवारी २०२४ पर्यंत स्वारस्य देकार मागविले आहेत.
महाराष्ट्राची ७२० किलोमीटरची किनारपट्टी ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा समुद्रकिनारपट्टी आहे. यामुळे राज्यात सागरी विकासाची प्रचंड क्षमता आहे. आजघडीला राज्यात दोन प्रमुख बंदरांसह ४८ छोटी बंदरे आहेत. यामुळे येथील सागरी संसाधनांचा लाभ उठवून राज्याच्या आर्थिक वृद्धीसाठी राज्य शासनाने हे उद्योग सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. यातून नोकऱ्या निर्माण करण्याबरोबरच किनारपट्टीचा विस्तार हा केवळ पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक करण्यासाठीच न करता त्या भागातील नागरिकांची सामाजिक-आर्थिक प्रगती साधणे हा हे उद्योग सुरू करण्यामागचा उद्देश आहे.
संपूर्ण किनारपट्टीलवर सूक्ष्म/लहान/मध्यम/मोठे/मेगा सुरू करणे. यात प्रामुख्याने कॅप्टिव्ह जेट्टी, शिपयार्ड, जहाज दुरुस्ती, जहाजांचा पुनर्वापर, मरिना विकसित करणे, रो-रो/रो-पॅक्स फेरी सेवा सुरू करणे, कोस्टल शिपिंगला चालना देणे, बंदराच्या विकासासाठी आवश्यक अशा औद्योगिकीकरण वाढविण्यासह जलवाहतूक, फ्लोटेल्स, हाउसबोट्स, सीप्लेन, पाण्यावर धावणाऱ्या बस सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय पर्यटकांना समुद्र भ्रमणासह मनोरंजनासाठी मासेमारी करण्याचा आनंद घेता येईल, असे पर्यटनपूरक उद्योग, व्यवसायांना चालना देण्यात येणार आहे.
सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी नवी मुंबईत हे ‘फ्लोटेल’ उभारले जाणार आहे. गेल्या वर्षीच यासाठी निविदा मागविल्या होत्या. कारण या परिसरात लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळ आकार घेत आहे. सी लिंकच्या उभारणीमुळे दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई शहर एकदम जवळ येणार आहे. याच परिसरात जगप्रसिद्ध घारापुरी लेणींसह बेलापूर किल्ला, जेएनपीटी, गेटवे ऑफ इंडिया, रेवस मार्गे अलिबाग जोडले जाणार आहे. यामुळे ‘फ्लोटेल’ उभारण्यासाठी नवी मुंबईतील बेलापूर-उलवे खाडीची निवड केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button