रत्नागिरीत जागतिक ‘वॉक फॉर फ्रीडम’
मानवी तस्करीबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक ‘वॉक फॉर फ्रीडम’ च्या रत्नागिरी आवृत्तीत 360 हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. आधुनिक काळातील गुलामगिरीच्या विरोधात, जगातील अनेक देशांपैकी भारत देशामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात १०० ठिकाणी आणि ५० देशांमध्ये ५०० पेक्षा जास्त ठिकाणी, हजारो लोक ह्या वॉक फॉर फ्रीडम पदयात्रेत सामील झाले होते.शनिवारी रत्नागिरी येथे मानवी तस्करीबद्दल जनजागृती करण्यासाठी कॉर्पोरेट, महाविद्यालये आणि स्वयंसेवी संस्थांमधील 360 हून अधिक नागरिकांनी वॉक फॉर फ्रीडम मध्ये सहभाग घेतला.
वॉकचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मुख्य लोक अभिरक्षक ऍड अजित वायकुळ, आयुधा देसाई विधी सहाय्यक लोक अभिरक्षक, श्री धूतपापेश्वर लिमिटेड चे प्रतिनिधी, पटवर्धन शाळेतील वाघमारे सर, नवनिर्माण शाळेतील साळवी हे मान्यवर उपस्थित होते. मुख्य लोक अभिरक्षक ऍड अजित वायकुळ, आयुधा देसाई विधी सहाय्यक लोकअभिरक्षक यांनी मानवी तस्करीचे वास्तव आणि समाजात जनजागृतीची गरज यावर भाष्य केले.
वॉकच्या सुरुवातीला रत्नागिरी आणि देशभरातील सहभागींनी त्यांच्या हयातीत तस्करी थांबवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची शपथ घेतली
www.konkantoday.com