
जिल्ह्यात २७ कोटींची वीजबिल थकबाकी
महावितरण रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त आकडेवारीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात वीजग्राहकांकडून एकूण २७ कोटी १६ लाखांची वीजबिल थकबाकी आहे. महावितरणच्या वतीने वसुली मोहीम देखील हाती घेण्यात आली आहे. मात्र अद्याप थकबाकीचा मोठा आकडा कायम आहे.
प्राप्त आकडेवारीनुसार जिल्ह्यात महावितरणचे चिपळूण, खेड व रत्नागिरी हे विभाग आहेत. यातील रत्नागिरी विभागात १२ कोटीची थकबाकी आहे. त्याखालोखाल खेड ८ कोटी २७ लाख व चिपळूण ६ कोटी ८८ लाख इतकी थकबाकी आहे.
www.konkantoday.com