
खेड, दापोली, मंडणगडात ५४०१ मीटरची जोडणी
महावितरण कंपनीच्या विविध धोरण व योजनांतर्गत दापोली, खेड व मंडणगड तालुक्यात एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत ५,४०१ ग्राहकांच्या मागणीनुसार नवीन मीटर बसवून वीज जोडणी देण्यात आल्याची माहिती महावितरणच्या येथील विभागीय कार्यालयाकडून देण्यात आली.
येथील महावितरणकडे दिवसागणिक वीज जोडणीची मागणी वाढतच आहे. ग्राहकांना विजेच्या सुविधेची पूर्तता करण्यासाठी येथील विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता विशाल शिवतरे यांच्या मार्गदर्शनाखाली तिनही तालुक्यातील अधिकारी व वीज कर्मचारी प्रयत्नशील आहेत. महावितरणच्या कृषी धोरण, ग्राहक योगदान योजना, परवाना योजना, मागील प्रलंबित वीज कनेक्शन अनुशेष, जिल्हा नियोजन समिती (एनडी), जिल्हा नियोजन समिती (एससीपी), इलेक्ट्रीय, वाहन चार्जिंग स्टेजन योजना, नवीन कनेर्कंशन योजना, लोकप्रतिनिधी शिफारस मागणी (एनएससी), आदींमार्फत गतवर्षात ५४०१ नवीन मीटर बसवून वीज जोडणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
www.konkantoday.com