रत्नागिरीतील भेसळयुक्त मिठाई व केक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्याची मनसेची मागणी
रत्नागिरीतील
खाद्यपदार्थ, मिठाई, केक विक्रेते इ. आस्थापनांची नियमित तपासणी करून भेसळयुक्त, निकृष्ट पदार्थ विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी सहाय्यक आयुक्त(अन्न), अन्न व औषध प्रशासन यांना
रत्नागिरी यांना तालुकाध्यक्ष श्री. रूपेश जाधव यांच्या नेतृत्वात मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
रत्नागिरीतील शहरी व ग्रामीण भागातील अनेक विक्रेत्यांकडून अन्न व औषध प्रशासनाच्या संहितेचे वारंवार उल्लंघन करून भेसळयुक्त, निकृष्ट पदार्थ राजरोसपणे विकले जात असून यात प्रामुख्याने मिठाई, केक आदीचा समावेश आहे मनसेच्या वतीने संबंधित विभागाला संशयास्पद आस्थापनांवर धाडी घालणे अपेक्षित असून जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा विक्रेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. .
सहाय्यक आयुक्त श्री. शिंदे यांच्याकडून अशा आस्थापनांवर लवकरच धाडसत्र चालू करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
या प्रसंगी निवेदन देताना तालुकाध्यक्ष रूपेश जाधव, तालुका उपाध्यक्ष सौरभ पाटील, विभाग अध्यक्ष अखिल शाहू, जयेश फणसेकर, सोम पिलणकर, संदीप सुर्वे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com