मुंबई ते चीपी (सिंधुदुर्ग) या हवाई मार्गावर सुरू केलेले अलायन्स एयर ही हवाई वाहतूक कंपनी रद्द करावी-खासदार विनायक राऊत यांची मागणी
मुंबई ते चीपी (सिंधुदुर्ग) या हवाई मार्गावर सुरू केलेले अलायन्स एयर ही हवाई वाहतूक कंपनी रद्द करावी, तसेच अपयशी ठरलेल्या आय.आर.बी. या चीपी एअरपोर्टच्या ऑपरेटरला रद्द करा आणि इंडिगो, अकासा सारख्या हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना सिंधुदुर्ग मध्ये हवाई वाहतूक करण्याची परवानगी द्यावी, ही मागणी शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी नागरी विमान मंत्रालयाचे मंत्री मा.ना.श्री.ज्योतिरादित्य शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीमध्ये खासदार श्री.विनायक राऊत यांनी केली व तसे लेखी पत्रही मंत्री महोदय यांना दिले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व इतर सर्व संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून सिंधुदुर्गच्या हितासाठी योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन मंत्री महोदय यांनी दिले.
www.konkantoday.com